Marathi Sex Stories चिटपाखरु 3

sexstories

Administrator
Staff member
जेवणाची वाट बघत आम्ही चौघे बसलो होतो. बॉसने आमचे व्हिस्कीचे व बायकांसाठी वाइनचे ग्लास भरुन आणले. आम्ही मजेत घोट घेत खासनाम्याने बनवलेले त्याचे स्पेशल बोटी कबाब व खारे काजु खात बसलो होतो. बॉसने त्याची आवडीची भिमसेन जोशीची गाणी लावली होती.

ऑक्टोबरचा महिना सरत आला होता. कोजागिरी एका दिवसावर येऊन ठेपली होती. बागेत मस्त शरदाचे चांदणे पसरले होते. हवा बऱ्यापैकी गार झाली होती. आमच्या गप्पा मस्त रंगत होत्या. खास करुन माझ्या व बिनाच्या.

"चल श्री एक बागेत फेरी मारुन येऊ." बिना मला आज दुपारपासुन श्री अशीच हाक मारत होती हे माझ्या आता लक्षात आले. आम्ही दोघे बाहेर पडलो. बिनाला ताऱ्याची नावे त्याच्या जागा याची बरीच माहिती होती. तिची मनोसक्त ताऱ्यावरची बडबड एकुन व चांदण्यात अर्ध्या तासात फिरुन आम्ही परत आलो. बंगल्याच्या पायऱ्या चढताना बिनाने मला बजावले, "श्री उद्या सकाळी मीही तुझ्याबरोबर वॉकला येणार आहे."

दुस्ऱ्या दिवशी सवयीन मी साडेपाचला उठलो व सगळ आटपुन माझा जुना ट्रॅकसुट व स्निकर्स घालुन माझा निकॉन एसेलआर डिजीटल कॅमेरा घेऊन बाहेर पडणार तितक्यात कानावर आवाज आला, "गुडमॉर्नींग श्री! मीही तयार आहे."

मागे वळुन पाहिले तर खरच बिना आपल्याकडे येणारे परदेशी टुरीस्ट घालतात तशा पायघोळ सुती झगा व त्याच्या वर पुढे बटने असलेला स्वेटर घालुन माझ्याबरोबर जायला तयार होती. तिने पायात तिचे नायके चढवले होते व सोनीचा छोटा कॅमेरा घेऊन ती एकदम तयार होती.
 
Back
Top